Baramati News l निंबुत येथील पारधी समाजातील महिलांसाठी हळदी-कुंकू तसेच तिळगुळ समारंभाचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबूत ता. बारामती येथे पहिल्यांदाच पारधी समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगूळ वाण लुटायचा कार्यक्रम पार पडला.
             प्रगती बहुउददेशीय सामाजिक संस्था वाघळवाडी सो.नगर या संस्थेच्या अध्यक्ष सुचिता साळवे यांनी नुकतेच पारधी समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू ठेवले होते. यावेळी या समाजातील महिला पुरुष, मुले  जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री उगले तसेच श्री दिक्षित,अंगणवाडीच्या शर्मिला जगताप, स्वप्ना काकडे तसेच सोनाली काकडे, शोभा जगताप तसेच वाघळवाडी येथील सुनिता सावंत, सोनाली म्हस्के तसेच भाग्यश्री सकुंडे. संस्थेचे सचिव डॉ. जगन्नाथ साळवे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुचिता साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी पारधी समाजातील काही समस्या यांची त्यांना जाणीव करून दिली. लवकर लग्न आणि लगेच मुलं मग त्यांची ग्रामपंचायत मधेही नोंद नसते आणि शाळेतही त्यामुळे मुलांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्या राहणीमानात आता बदल झाला आहे तसाच त्यांच्या विचारातही बदल व्हावा असे त्या म्हणाल्या. संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कामासंदर्भात सर्वांना माहिती दिली तिथल्या सर्व महिलांना स्वच्छतेचा संदेश म्हणून खोबरेल तेलाच्या बाटल्या  आणि बाऊल चमचे असे वाण देण्यात आले.कारण ही मुले जेव्हा शाळेत येतात तेव्हा तिथल्या शिक्षकांना त्यांना केसांना तेल लावून शाळेची कपडे घालावी लागतात आणि पुन्हा शाळा सुटल्यावर ते कपडे काढून कपाटात ठेवावी लागतात.   सोबत त्यांना आणि मुलांना खाऊ वाटपही ठेवले होते. याप्रसंगी डॉ. जगन्नाथ साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार दिक्षित सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शर्मिला जगताप यांनी खूप मदत केली असे अध्यक्ष सुचिता साळवे म्हणाल्या. आज या समाजातील महिलांना पहिल्यांदा अशा हळदी कुंकू कार्यक्रमात मानाने बोलवलं आम्हाला देखील माणूस समजलं आम्ही मुलांना रोज शाळेत पाठवून पुढचेही शिक्षण पूर्ण करु अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि  संस्थेचे देखील आभार मानले.
To Top