वेल्हे l मिनल कांबळे l तोरणा किल्ल्यावर चक्कर येऊन पुण्याच्या पर्यटकाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर एका पर्यटकांचा चक्कर येऊन मृत्यू झाला असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली,
          याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की किल्ले तोरणागडावर आलेल एका पर्यटकांस चक्कर आली व बेशुदध झाला होऊन मृत्यू झाला.रणजित मोहनदास शिंदे वय. ४३ वर्ष, रा. २/४ लोट्स बी अदित्य गार्डन सिटी वारजे पुणे असे मृत्यु झाल्याचे व्यक्तीचे नाव आहे. शिंदे तोरणा गडावर ट्रेक साठी गेले असताना गडावर हृदय विकाराचा झटका आल्यामुळे मयत झाले. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन  टीम ने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन टीम मधील तानाजी भोसले आणि त्यांची टीम मधील जवानांनी रात्रीच्या अंधारात शव स्टेचर च्या मदतीने किल्ल्याच्या पायथ्याला आणले .
याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप दिवार करीत आहेत.
To Top