सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
आयडीबीआय बँकेकडून प्राथमिक शाळा गडदरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वाडी यांना सी एस आर फंडातून प्रोजेक्टर, व एलईडी संच भेट देण्यात आला.
आयडीबीआय बँकेचे चीफ जनरल मॅनेजर (झोनल हेड) आशुतोष कुमार यांच्या हस्ते गडदरवाडी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सुरेश शितोळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वाडी शिक्षिका शारदा खामकर यांच्याकडे ग्रामस्थ व मुले यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला. यावेळी गरदडवाडीचे सरपंच मालन शिवाजीराव गरदडे, उपसरपंच सीमा गलांडे, खंडोबाचीवाडी सरपंच संतोष उत्तम धायगुडे, बँक अधिकारी सिद्धार्थकुमार ध्रुव श्रीवास्तव, श्रीनिवास पाटील, भारत माने, स्वप्निल डोईफोडे, माधुरी गडदरे, संभाजी गडदरे, संगीता मदने, मनीषा शितोळे, मंगल भुसे, त्याचबरोबर गडदरवाडी व खंडोबाची वाडी येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेत ई लर्निंग संच भेट मिळाल्यामुळे धनंजय गडदरे व शिवाजी गरदडे यांनी आभार व्यक्त केले.