सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या 'बंगल्या'वर तपासयंत्रणेची धाड पडून तब्बल ३० तास उलटले असून अजूनही तपास यंत्रणेतील अधिकारी त्यांच्या बंगल्यामध्ये तपास करीत आहेत.
आज सलग दुसऱ्या दिवशीही हा तपास सुरूच आहे. श्रीमंत संजीवराजे यांचा 'सरोज व्हिला' या या बंगल्याचा काल सकाळी ६ वाजलेपासून तपासयंत्रणेनी ताबा घेतला आहे या तपासाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती यंत्रणेकडून देण्यात आलेली नसली तरी श्रीमंत संजीवराजे यांच्या 'गोविंद मिल्क' डेअरीच्या अनुषंगाने प्राप्तीकर विभागाचा हा तपासाचा फेरा सुरु असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, श्रीमंत संजीवराजे यांच्यावर ही चौकशीची धाड पडल्यापासून फलटण शहर व तालुक्यातून अस्वस्थ भावना व्यक्त होताना दिसत असून विशेषतः सोशल मिडीयावर याचे पडसाद उमटतं आहेत. काल सकाळी याबाबतची बातमी सर्वत्र पसरल्यापासून अनेक जण हा प्रकार योग्य नसल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. राजे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या प्रकाराला राजकीय किनार असल्याची शक्यता बोलून दाखवत आहेत.