सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर ग्रामपंचायत उपसरपंचपदाच्या निवडणूकित तुषार राजकुमार सकुंडे यांनी १३-१ अशी मते मिळवत उपसरपंचदी विराजमान झाले.
सरपंच हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच गणेश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त उपसरपंच पदासाठी तुषार सकुंडे व निशिगंधा सावंत या २ सदस्यांचे अर्ज दाखल झालेले होते. त्या निवडीमध्ये तुषार सकुंडे हे एकूण १४ मतापैकी १३ मते घेऊन प्रचंड मताधिक्याने विजयी झाले तर निशिगंधा सावंत या अवघे १ मत मिळाले.उपसरपंच निवडणुकी वेळी उपस्थित बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश सकुंडे, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, बारामती शहर शिक्षक सेल अध्यक्ष अविनाश सावंत, माजी उपसरपंच गणेश जाधव, जितेंद्र सकुंडे ग्रामपंचात सदस्य अनिल शिंदे, विशाल हंगिरे, प्रभाकर कांबळे, महिला सदस्य धनश्री जाधव, निर्मला केंगार, आशा चव्हाण, अनिता दडस, सुषमा सावंत, सोनाली दडस, ग्रामस्थ गजानन सकुंडे, पांडुरंग भोसले, हिंदुराव सकुंडे, सागर जाधव, सचिन जाधव दीपक दनाने रवींद्र कायंगुडे, विकास शेडगे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते, ग्रामविकास अधिकारी संजयकुमार भोसले यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
नवनियुक्त उपसरपंच तुषार सकुंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास साठी सर्वांगीण विकास केला जाईल असे त्यांनी सांगितले प्रचंड बहुमताने निवड केल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले.