सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात पोलीस ठाण्याच्या संदर्भीय पत्रांन्वये मंगळवार दि.१८ रोजी भोर बस स्थानक दीक्षाभूमी ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चौपाटी पर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याने मंगळवारचा आठवडे बाजार भिलारे बिल्डिंग ते कोर्ट रस्त्यावर भरणार असल्याचे नगरपरिषद कार्यालयाकडून निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली.
नगरपरिषद कार्यालयाच्या निवेदनानुसार पोलीस निरीक्षक भोर पोलीस ठाणे यांचे दि.१५ रोजी च्या संदर्भीय पत्रान्वये अकालकथित विक्रम गायकवाड न्याय हक्क कृती समिती भोर यांचे वतीने दि.१८ रोजी मंगळवार सकाळी ११ वा. दिक्षा भुमी एस.टी स्टॅड.भोर ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चौपाटी भोर असे मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यामुळे एसटी स्टँड भोर ते चौपाटी मार्गावर भरणारा आठवडी बाजार हा भिलारे बिल्डींग ते कोर्ट रस्ता या मार्गावर स्थलांतरित केला आहे.असे भाजीपाला विक्रेते व व्यापारी यांना भोर नगरपरिषदेकडून आवाहन करण्यात आले आहे.