सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर - महाड मार्गावरील पोम्बर्डी ता.भोर येथील हद्दीतील स्टोनक्रशर जवळ पैसे देवाण-घेवाणीच्या वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना शनिवार दि. ८ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.
बाबविक्रम दादासाहेब गायकवाड (वय ३० वर्ष, रा. उत्रौली ता. भोर) असे मयत तरुणाचे नाव असून अनुज मल्हारी चव्हाण (वय अंदाजे २४ वर्ष, रा. वेनवडी, ता.भोर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत सागर दादासाहेब गायकवाड (वय २८ वर्ष) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विक्रम गायकवाड याने संशयित आरोपी अनुज मल्हारी चव्हाण (वय २४, रा. वेनवडी, ता. भोर) याच्याकडे हात उसने दिलेले पैसे परत मागितले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला.वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या आरोपीने धारदार शस्त्राने विक्रमवर अनेक वार केले.विक्रम गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलीस उपअधीक्षक दिलीप पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णा पवार आणि त्यांची टीम या घटनेचा तपास करत आहे.प्राथमिक चौकशीत आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून हा वाद उफाळल्याचे समजले आहे.