Bhor News l भोर पं.समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
माजी मंत्री अनंतरावजी थोपटे यांचे पुतणे,भोर पंचायत समितीचे आदर्श माजी सभापती अशोकराव ऊर्फ बाळासाहेब विठ्ठलराव थोपटे (वय -७५) रा. हातनोशी ता.भोर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने बुधवार दि.१९ निधन झाले.
          मागील ४० वर्षापासून सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असणारे बाळासाहेब थोपटे (आण्णा) काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षांपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.त्यांच्या राजकीय कारकीर्दीत तालुक्यातील लहान- थोरांशी दांडगा जनसंपर्क होता.बाळासाहेब थोपटे यांच्या निधनाने तालुक्यातील सर्व स्तरात तसेच विसगाव खोऱ्यासह हातनोशी गावावर शोककळा पसरली आहे.काही वर्ष बाळासाहेब थोपटे यांनी कात्रज दूध संघात संचालक म्हणून काम पाहिले आहे.त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे,दोन मुली,दोन भाऊ, पुतणे असा परिवार असून माजी आमदार संग्राम थोपटे यांचे ते चुलत भाऊ होत.
-----------------
अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय 
 बाळासाहेब थोपटे यांच्या बुजुर्गान्सी असणाऱ्या मनमिळाऊ स्वभावामुळे भोर तालुक्यात त्यांचा राजकीय क्षेत्रात गवगवा होता.तर त्यांची प्रशासकीय कामावर उत्कृष्ट पकड असल्याने व सामाजिक कार्यात कायमच पुढाकार घेऊन सामंजस्याने कार्य केल्याने कायमच त्यांच्या संपर्कात तालुक्यातील लहान-थोर असत.त्यांचा अंत्यविधी हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला.

To Top