सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना वाई पोलीसांनी अवघ्या तीन तासात जेरबंद करत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
दि. १९ रोजी बाभळवन सोनगिरवाडी येथील वाई येथील मोकळ्या जागेत एका तरुणाचा खुन झाल्याची प्राथमिक माहिती वाई पोलीसांना प्राप्त झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखुन वाई पोलीस तात्काळ घटनास्थळावर पोहचुन सदरची माहिती वाई पोलीस ठाणेचे प्रभारी परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर यांना दिल्यानंतर ते देखील घटनास्थळावर तात्काळ दाखल होऊन सदरच्या खुनाबाबत अधिक माहिती घेतली असता मयताचे नाव राज अरुणकुमार सिंग वय २६ वर्षे सध्या रा साक्षी विहार वाई मुळ रा. बिहार असे असल्याचे निष्पन्न झाले सदर ठिकाणी अधिकची चौकशी करता मयत व त्याचे मित्र हे सोनगिरवाडीमधील बाभळवन येथील मोकळ्या जागेत दारु पिण्यासाठी बसलेले असता मयत व त्याचे दोन मित्र प्रणित दिपक गायकवाड वय २५ वर्षे शाकीर शहाबुद्दीन खान दोघे राहणार आंबेडकर नगर यांचेमध्ये पार्टी करीत असतांना चेस्टा मस्करीचे वादातुन मयत राजसिंग यांस फुटलेल्या बियरच्या बॉटलने व लाकडी बांबुने डोक्यावर व हातावर अमानुषपणे मारहाण करुन त्याचा निर्घण खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर प्रभारी अधिकारी यांनी दोन पोलीस पथके तयार करुन त्यांस आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केल्यानंतर तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपी हे त्याचेकडील वाहनावरुन परखंदी रोडने पळुन गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तपासपथकाने परखंदी घाटात सदर आरोपींचा शोध घेतला असता, ते दोघे परखंदी घाटातील डोंगरात लपुन बसल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना तपासपथकाने सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेऊन त्यांस अटक करण्यात आलेली आहे.
अटक आरोंपीना मा. न्यायालयात समक्ष हजर केले असता, त्यांस पोलीस कोठडी सुनावली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास परि. पोलीस उपअधिक्षक श्री श्याम पानेगावकर हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे सहा पोलीस उपनिरीक्षक मुकुंद माळी, पो. हवा मदन वरखडे, धिरज यादव, अजित जाधव, पो.कॉ रुपेश जाधव, राम कोळेकर, गोरख दाभाडे, राम कोळी, नितीन कदम, प्रसाद दुदुस्कर, हेमंत शिंदे, विशाल येवले, धिरज नेवसे, सागर नेवसे, श्रावण राठोड, विशाल शिंदे, अक्षय नेवसे, ज्ञानेश्वरी भोसले, शितल कुदळे, स्नेहल सोनवणे यांनी केली असुन मा. पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.