सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वेल्हे : मिनल कांबळे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व वेल्हे येथील मेंगाई देवी यात्रा निमित्त वेल्हे ते कात्रज पीएमपीएल बससेवा आजपासून सुरू करण्यात आली.आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून वेल्हेकर एम पी एल च्या बस सेवा ची वाट पाहत आहेत. अखेर छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मेंगाई देवी यात्रेनिमित्त बस सेवा सुरू करण्यात आली. बस सेवा पीएमआरडीच्या हद्दीपर्यंत पाबेगाव पर्यंत सुरू होती. गेले अनेक दिवस तालुक्यातील नागरिक व राजकीय पक्षाचे नेते हे वेल्हे या गावापर्यंत बस सेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करीत होते, आमदार शंकर मांडेकर यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा देखील केलेला आहे. प्रायोगिक तत्वावर 19 फेब्रुवारीपासून ते 26 फेब्रुवारी पर्यंत ही बस सेवा वेल्ह्यापर्यंत सेवा देईल, अशी माहिती पीएमपीएल प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आजपासून पीएमपीएल ची सेवा गेल्यापर्यंत सुरू झाली आहे याचे उद्घाटन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व माजी सभापती निर्मला जागडे, विकास नलावडे, सुनील राजीवडे, किर्ती देशमुख, बंडा कदम, आदीसह वेल्हेकर उपस्थित होते.
-------------–---------
वेल्हे ते कात्रज ही बस सेवा सुरू झाली त्याबद्दल पी एम पी एल प्रशासनाचे स्वागत आहे परंतु ही बस सेवा कायमस्वरूपी राहावी अशी आमची मागणी आहे
आनंद देशमाने, माझी जिल्हा परिषद सदस्य