सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
'मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा' अभियानामध्ये न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती (चोपडज) या विद्यालयाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे. स्वच्छता, वृक्षारोपण, विज्ञान प्रदर्शन, पालक बैठका, विद्यार्थी सहभाग, सायकल बँक, व्याख्याने आशा विविधांगी कामामुळे या विद्यालयास हा पुरस्कार मिळाला आहे.
शैक्षणिक वर्ष सन 2024 -25 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती (चोपडज-वाकी) या विद्यालयाचा चालू शैक्षणिक वर्षी प्रथम क्रमांक आला आहे . तालुक्यात अनेक दिग्गज संस्था आहेत मात्र गुणवत्ता आणि उपक्रम आणि शिस्त याच्या जोरावर विद्यार्थी घडवल्याने गिऱ्हाईक भागातल्या न्यू इंग्लिश स्कूलला प्रथम क्रमांक मिळाला असून शासनातर्फे विद्यालयास तीन लाखाची बक्षीस मिळाले.
गेल्या 2023 -24 या शैक्षणिक वर्षात या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन विद्यालयाने तृतीय क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस मिळविले होते. याशिवाय शालेय शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघ यांचाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रथम क्रमांक या विद्यालयास मिळाला आहे. विद्यालयाच्या या यशामध्ये मुख्याध्यापक इनामदार एस जे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सिंहाचा वाटा आहे .विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यावर पालक वर्गातून व ग्रामस्थांमधून अभिनंदनचा वर्ष होत आहे .
संस्थेचे अध्यक्ष प्रवीण भोसले, उपाध्यक्ष हनुमंत जगताप, मानद् सचिव रमेश भोसले व सर्व संचालक मंडळ यांनी मुख्याध्यापक इनामदार एस.जे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे अभिनंदन केले