सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोरला ॲग्रीस्टॅक, ई-हक्क, ई-फेरफार, शेत पानंद रस्ते खुले करण्याबाबत पंचायत समिती भोर येथील सभागृहात प्रशासकीय आढावा बैठक शुक्रवार दि. २८ पार पडली.बैठकीत उपजिल्हाधिकारी (रजा राखीव)पुणे नामदेव टिळेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भोर उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेद्र नजन,गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, नायब तहसीलदार आजिनाथ गाजरे,तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, सहाय्यक निबंधक बाळासाहेव तावरे तसेच मंडल अधिकारी,ग्राम महसुल अधिकारी, कृषी सहाय्यक,विकास सोसायटीचे सचिव उपस्थित होते.
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करतना शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे या करिता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात संग्राम ऑपरेटर व सी.एस.सी केंद्र चालकाच्या मदतीने गावनिहाय कैम्प आयोजीत करणेत यावेत तसेच सदरचे कामकाज हे मोठ्या प्रमाणात सुरु करुन ते लवकारात लवकर पूर्ण करणेबाबत सुचना दिल्या. तसेच पानंद रस्ते पुर्वीचे आहेत त्याबाबत सविस्तर चौकशी करुन सदरचे पानंद रस्ते खुले करणेबाबत सूचित केले.
ग्राम महसूल अधिकारी स्तरावर यापुढील सर्व अर्ज ह ई- हक्क प्रणालीमार्फत प्राप्त करुन घेवुन त्यावर योग्य ती कार्यवाही ठरवून दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी. ई-चावडी आज्ञावलीमध्ये डी- ४ करणेसाठी मार्गदर्शन केले. ई-फेरफारमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत नोंदणीचावत आढावा घेतला त्यामधील तक्रारी नोंदी लवकारात लवकर निर्गत करणेबाबत मार्गदर्शन करुन नोंदी निर्गतीचा कालावधी कमी करणेबाबत सुचना दिल्या.