सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे पूर्वीच्या भांडणातून हत्याराने वार करत २२ वर्षीय तरुणाचा खून केला असल्याची घटना घडली आहे.
शिरवळ गावच्या हद्दीमध्ये एका कंपनीलगत असणाऱ्या चौकात पूर्वीच्या भांडणातून अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर (वय 22,वडवाडी ता.खंडाळा) असे मृत युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे खून करणारा युवक तेजस महेंद्र निगडे (वय 19,रा.गुणंद ता.भोर जि. पुणे हा स्वतः शिरवळ पोलीस स्टेशनला हत्यारासहित हजर झाला आहे, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलीसांनी युवकाला ताब्यात घेतले असून खंडाळा तालुक्यासह भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे.