सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील ॲड. चंद्रशेखर रमेशराव जगताप यांची पाच वर्षासाठी नोटरी भारत सरकार या पदी नियुक्त करण्यात आले आहे.
केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय, नवी दिल्ली यांनी जगताप यांना नोटरी भारत सरकार या पदी नियुक्ती केली आहे. जगताप हे मागिल पंधरा वर्षापासुन बारामती येथील जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करीत आहेत. तसेच त्यांनी बारामतीसह दौंड व इंदापूर तालुक्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
बारामती तालुक्यातील सुपे ही मोठी बाजारपेठ आहे. तसेच येथे मोठी व्यापारीपेठ व शैक्षणिक केंद्र आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना विविध कागदपत्रे नोटरी करणे कामी बारामती अथवा केडगाव अशा दुरच्या ठिकाणी जावे लागत होते. ही गैरसोय आता जगताप यांची नोटरी पदी नियुक्ती केल्याने संपुष्टात येणार असुन त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
---------------------------------------------