सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
देशात व राज्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेली खाजगी साखर कारखान्याची संख्या लक्षात घेता सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व ऊस उत्पादक सभासदांनी जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता. बारामती येथे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांच्या वतीने नेतृत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, सोमेश्वर चे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सचिव कालिदास निकम, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, दिपक निंबाळकर, विराज निंबाळकर, व्याखाते महेंद्र खरात, पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, व्हीएसआय पुणेचे डॉ. अशोक कडलग, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. तुषार शितोळे सोमेश्वर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
जगताप पुढे संचालक मंडळाच्या हक्क आणि जबाबदारी काय असतात यासाठी असे कार्यक्रम वारंवार आयोजीत करण्याची गरज आहे. व्हावे लागतात. देशात आणि राज्यात सहकारी साखर कारखण्यापेक्षा खाजगीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इथून पुढे सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी कारखान्याशी संबंधित सर्वच घटकाने जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. दुर्लक्ष केले तर सहकारी लिक्विटेशन मध्ये जातात त्याला खाजगी कारखाने विकत घेतात. जर सहकारी साखर कारखाने चांगले चालवले तर खाजगी कारखान्याला आपण थोपवू शकतो. त्यामुळे खाजगीला तोंड देऊन सहकाराला हातभार देणायची गरज आहे. सहकार टिकवण्यासाठी एकत्र राहून हे काम करण्याची गरज आहे. खाजगीचे वर्चस्व निर्माण झले तर भविष्यात अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना निरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार म्हणाले, जादा गाळप केले तर उत्पादन खर्च कमी होते. कमी गाळप झाले उत्पादन खर्च वाढतो व कारखाने आर्थिक अडचणीत जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कारखान्यालाच ऊस द्यावा. खाजगी कारखाने काही काळ बरे वाटतात. मात्र नंतर त्यांची मक्तेदारी निर्माण होऊन वाईट दिवस येतात असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन भोसले यांनी केले तर आभार कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी मानले.