सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद ; निलेश काशीद
लोणंद ता. खंडाळा येथील शास्त्री चौकात लोनंद पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असताना एका संशयित टमटम ला अडवून त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या गाडीत चोरीचे टायर व डिस्क असल्याचे आढळून आले. याबाबत लोनंद पोलिसांनी ३ लाख ७२ हजारांच्या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास लोणंद ता. खंडाळा गावचे हददीत शास्त्री चौक येथे एक संशईत महींद्रा कंपनीची जिते टमटम क्रमांक एम.एच.11. सी.एच.4628 ही पाठीमागे हौदयामध्ये नवीन टायर भरुन जाताना दिसुन आली. तिचा पाठलाग करुन टमटम थांबवले असता चालक रोहीत ओमप्रकाश विश्वकर्मा वय 23 रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा हा त्यामध्ये मिळुन आला. त्यावेळी त्यास गाडीमध्ये असलेले टायर याबाबत माहीती विचारली असता त्याने असमाधानकारक माहीती देवुन उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. त्याचे ताब्यात 1 लाख रुपये किंमतीचा महींद्रा कंपनीची जिते टमटम क्रमांक एम.एच.11. सी.एच.4628 ही त्यात 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचे डिस्क असलेल्या टायर व 42 हजार रुपये किंमतीचे टायर असा चोरी केलेला मुददेमाल मिळुन आला आहे. त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे पोकॉ. शेखर शिंगाडे यांनी फिर्याद दिली असुन गुन्हयाचा तपास पोहवा सर्जेराव सुळ हे करीत आहेत.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल रा.धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि विशाल कदम, देवेंद्र पाडवी, सर्जेराव सुळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, विठठल काळे, रमेश वळवी, केतन लाळगे, अंकुश कोळेकर, सतीष दडस, जयवंत यादव, संजय चव्हाण, होमगार्ड रविंद्र व्हटकर, दत्तात्रय येळे, अमर शेळके यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.