सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सामान्य प्रशासन तहसीलदार श्रीकांत पाटील व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे पाठलाग करून वाळू माफियांच्या १३ बोटीं पकडून त्या सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या. माळवाडी जॅकवेल जवळ तीन सक्शन बोट पकडून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. महसूल व पोलीस पथकाने सलग पाचव्यांदा संयुक्त कारवाई करून वाळू माफियांच्या वर कारवाई करत त्यांना चाप लावला आहे मात्र प्रशासनाने त्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.
सदर कारवाई मध्ये इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, करमाळा निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे, इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडी मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, मंडल अधिकारी काटी मल्लाप्पा ढाणे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, भूषण सुरवडकर तसेच तहसील कार्यालय करमाळा येथील सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र कदम, ग्राम महसूल आधिकारी चंद्रकांत नावाडे, गोरक्षनाथ ढोकणे, यादव ठोंबरे, मंगलसिंग गुसिंगे, इंदापूर तालुक्या तील पोलीस पाटील सुनील राऊत, प्रदीप भोई, अरुण कांबळे, विजयकुमार करे व बाळासाहेब कडाळे, पोलीस कर्मचारी विनोद रासकर, लक्ष्मण सूर्यवंशी, होमगार्ड गणेश वडवे, भारत लोखंडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील द्रोण सर्व्हेअर संकेत बाबर यांनी भाग घेतला. नागरिकांमधून या थेट कारवाईचे स्वागत होत आहे.