सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : प्रतिनिधी
भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा गंगाराम पवार यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली.गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी गुराप्पा गंगाराम पवार यांना १२ मते मिळाली तर श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांना ५ मते मिळाली.या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक कोकरे तसेच तलाठी राहुल देवकर आणि ग्रामपंचायत अधिकारी भगीरथ परदेशी यांनी कामकाज पाहिले.
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायती मध्ये कुंची कोरवी समाजाचा महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मान गुरप्पा पवार यांनी मिळविला. तर भिगवण गावच्या राजकारणातील आजचा महत्वाचा दिवस म्हणून ओळखला जाणार आहे.अगदी सर्वसामान्य नागरिकाला गावच्या सरपंच पदाचा मान मिळाल्यामुळे राजकीयदृष्ट्या हि नवी नांदी मानली जात आहे .भिगवण गावची निवडणूक पार पडताच सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका पदाधिकारी पराग रमेशराव जाधव आणि तत्कालीन पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी व्यक्त केली होती .त्याप्रमाणे ३ सदस्यांना सरपंच पदाचा तर ३ तीन सदस्यांना उपसरपंच पद देण्याचा शब्द देण्यात आला होता.यात धनगर समाजातील सदस्याला पहिला सरपंच पदाचा मान तर तेली समाजाच्या सदस्याला दुसऱ्या वेळी आणि कुंची कोरवी समाजाच्या सदस्याला आजच्या दिवशी सरपंच पदाचा बहुमान देण्यात आला तर रामोशी , मुस्लीम आणि बौद्ध समाजाच्या सदस्याला उपसरपंच पदाचा बहुमान देवून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न सत्तेतील कार्यकारिणीने केला . सर्व जाती जमातीच्या सदस्यांना सत्तेतील पदाचा लाभ देण्याचा दिशा दर्शक पायंडा भिगवण करांनी पाडला असून तो जिल्ह्यात वाखाणण्याजोगा आहे.
आजची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित असताना सरपंच पदासाठी दुसरा अर्ज दाखल करण्यात आला.त्यामुळे निवडणूक घेण्यात आली.यात सत्तेतील १६ मते विरोधातील एकच मत असतानाही ५ सदस्यांनी आपली मते विरोधात टाकल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.तर फुटलेली मते पदाचा मेवा चाखून झालेल्या सदस्यांची की पदे मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्या सदस्यांची याबाबत दबकी चर्चा सुरु झालीय. मात्र मतदान गुप्त असल्यामुळे नावे समजणें शक्य होणार नाही.या निवडीनंतर जयदीप जाधव ,अशोक शिंदे तसेच संजय देहाडे यांनी सुभेच्छा दिल्या तर निवनियुक्त सरपंच गुराप्पा (आबजी )पवार यांनी आभार व्यक्त केले.