वेल्हे l विंझर मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
विंझर येथे शिवजयंती निमित्त गावामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. 
             या वर्षीचे खास आकर्षण म्हणून राजगड तालुक्यातील राजगडाच्या कुशीत बसलेल्या विंझर या गावात ७२ फूट उंच स्तंभावर १४ फूट रुंद आणि २० फूट लांब असा भगवा ध्वज फडकवण्यात आला. हा ध्वज स्वराज्याची पहिली राजधानी राजगडासमोर डौलदारपणे फडकताना दिसला. हा भगवा ध्वज प्रत्येक हिंदू सणाला गावात फडवकवण्याचा संकल्प समस्त विंझर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माझी पंचायत समिती सदस्य संतोष  दसवडकर, अॅड. आण्णा शिंदे, सरपंच मोनाली  लिम्हण, माजी सरपंच सतिश लिम्हण, उपसरपंच राहूल सागर,  शिवाजी चोरघे, विशाल वालगुडे, किरण भोसले, विशाल लिम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.

To Top