वेल्हे l राजगड तालुक्यातुन तीन केंद्रावर ६४९ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस : तोरणा विद्यालयात गुलाबपुप्ष देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातुन तीन केंद्रांवर एकुण ६४९ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस बसले असुन तोरणा विद्यालय वेल्हे व न्यु इंग्लीश स्कुल विंझर येथे गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
           राजगड तालुक्यात एकुण तीन केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरु झाली.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तोरणा विद्यालय वेल्हे येथे एकुण १७२ विद्यार्थी 
परिक्षेस बसले असुन  येथे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी केंद्रसंचालक
अ.ए.बनसोडे,उपकेंद्रसंचालक मोहन किन्हाळे,सरंपच सीता खुळे,माजी सरपंच संतोष मोरे,बापु खुळे,नंदु खुळे,शुभम बेलदरे आदीसह शिक्षक विद्यार्थी 
उपस्थित होते,तर न्यु इंग्लीश स्कुल विंझर येथे एकुण १३३ विद्यार्थी परिक्षेस बसले असुन अॅडव्होकेट अण्णा शिंदे यांच्या हस्ते येथील विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प
देऊन करण्यात आले.यावेळी प्राचार्य भगवान बेल्हेकर,उपक्रेद्रसंचालक अजित कोंढाळकर,वसंत कराड,प्राध्यापिका जयश्री कादबाने,नरेंद्र गावित,
सुरेश पाटील,संजय चौधरी,दिपक कुवर उपस्थित होते,तर सरस्वती विद्यालय अंबवणे येथे एकुण ३४४ विद्यार्थी परिक्षेस बसले आहेत केंद्रसंचालक म्हणुन महादेव बेंद्र काम पाहत आहेत. वेल्हे पोलीस स्टेशनकडुन तीनही परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.कोणताही अनुचित प्रकार परिक्षेस होऊ देणार नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन खामगळ यांनी सांगितले,

To Top