सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
पानशेत जवळील निगडे मोसे ( ता. राजगड) येथे
शेतात काम करताना हरवलेले अडिच तोळे वजनाचे सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र कष्टकरी आदीवासी कातकरी समाजाच्या महिलेने प्रामाणिकपणे शेतकरी महिलेला परत आज शुक्रवारी (दि.२१) परत दिले.
समाजात प्रामाणिकपणा हरवत चालला असता निगडे मोसे येथील कातकरी वस्तीतील आदिवासी महिला मंगल गणेश जाधव हिने निस्वार्थीपणे किंमती मंगळसूत्र गावातील शेतकरी महिला वनिता दशरथ नलावडे हिला परत दिले. प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या मंगल जाधव हिचा निगडे मोसे महिला मंडळाच्या वतीने माजी सरपंच निर्मला नलावडे यांच्या हस्ते साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
काल गुरुवारी ( दि.२०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वनिता नलावडे या गावातील एका शेतात इतर महिला मजुरांसह ऊसाची बेणणी करत होत्या. सायंकाळी वनिता नलावडे या घरी आल्या. त्या गळ्यातील मंगळसूत्र कोठेतरी पडल्याचे त्यांना समजले. रात्रीच्या अंधारात शेतासह गावात तसेच रस्त्यावर शोध घेऊनही मंगळसूत्र सापडले नाही. त्यामुळे आज त्या शेतात कामाला गेल्या नाहीत.
आज सकाळी आशा कदम,उषा नलावडे, मंगल जाधव या तिघींनी शोध घेतला मात्र मंगळसूत्र सापडले नाही
त्यामुळे आशा कदम, उषा नलावडे या माघारी आल्या. त्यानंतर पुन्हा मंगल जाधव हिने ऊसाच्या शेतातील पाण्याच्या पाटात बारकाईने शोध घेतला असता तिला पाटा लगतच्या मातीत मंगळसूत्र सापडले.