सुपे परगणा l सुप्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी : महासिद्ध उत्सवाचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
सुपे (ता. बारामती) येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्यानिमित्ताने महासिद्ध उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, या उत्सवाची सांगता गुरुवारी ( दि. २७ ) हभप बंकटमहाराज ढवळे यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
           महाशिवरात्रीला ( बुधवारी ) सकाळपासुन स्वयंभु सिद्धेश्वरास दुग्धमहाभिषेक, होमहवन तसेच सकाळी १० वाजता ग्रामस्थांच्या सहभागाने 'श्री' ना मंगलस्नान घालण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी दर्ग्यानजीकच्या विहिरीचे पवित्र जल उपस्थित ग्रामस्थांनी वाजत गाजत आणले. त्यानंतर मंगलस्नान घालण्यात आले. यावेळी दुपारी चार वाजता 'श्री' ची पालखी प्रदक्षणा मुख्य पेठेतुन काढण्यात आली. यावेळी महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर होता. सायंकाळी दिपोत्सवाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच पिंडीवर वेगवेगळ्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.
          रात्री हभप देवराम गायकवाड यांचे
किर्तन झाले. येथील स्थानिक भजनी मंडळाचा गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी रात्री १२ च्या पुढे 'ॐ नम: शिवाय' या मंत्रोच्चाराने एक हजार बिल्वपत्र श्रीं ना वाहण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाल्याची असल्याची माहिती मंदिर न्यासाच्यानतीने देण्यात आली.
          -------------------------------
            
To Top