सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कात्रज : प्रतिनिधी
कात्रज परिसरातील जांभुळवाडी रस्त्यावर भरधाव दुचाकीवरील नियत्रंण सुटून दुचाकी विद्युत खांबावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
अपघातात दुचाकी चालक दत्ता कल्याण चोरमले (रा. आंबेगाव) व पाठिमागे बसलेला सहप्रवासी श्रीकांत गुरव अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई प्रकाश शिंदे यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरमले मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मित्र श्रीकांत यांच्यासोबत जांभुळवाडी रस्त्याने जात होते. गाथा स्विमिंग पूलजवळ आल्यानंतर भरधाव दुचाकीवरील नियत्रंण सुटले आणि दुचाकी कडेला असलेल्या लोखंडी विद्युत खांबावर आदळली. दुचाकीचा स्पीड जास्त असल्याने दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक सुरेश शिंदे अधिक तपास करत आहेत.