Purandar Breaking l चारचाकी व दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू : पुणे-पंढरपूर रस्त्यावरील दौंडज येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर दौंडजजवळ अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांच्यात अपघात होऊन दुचाकी गाडीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
         अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहनचालक न थांबता निघून गेले असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात अमोल विठ्ठल दगडे (वय ३८, मूळ गाव दौंडज, सध्या रा. मावडी क. प.) व दिग्विजय यशवंत कोलते (३४, रा. पिसर्वे ता. पुरंदर) या तरुणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. २३ रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरील अमोल दगडे व दिग्विजय कोलते हे दोघेजण दौंडजहून जेजुरीकडे जात होते, तर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर अज्ञात वाहन निघून गेले. या अपघातात दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.
To Top