Wai Breaking l पांडवगडावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला : जखमींमध्ये इंदापूर तालुक्यातील चौघांचा समावेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
मधमाशांच्या हल्ल्यात इंदापूर तालुक्यातील चार पर्यटक गंभीर जखमी झाले. यातील दोघे बेशुद्धावस्थेत होते. जखमींना वाई येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज, सोमवार सकाळच्या सुमारास पांडवगडावर घडली.
         अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ आवटी, गोपाळकर दंडवते, चैतन्य देवळे, संतोष जापे अशी जखमींची नावे आहेत. याबाबतची माहिती वाई पोलिसांना व तालुका वैद्यकीय कक्षाला समजताच त्यांनी रुग्णवाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली. अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ आवटी, गोपाळकर दंडवते, चैतन्य देवळे, संतोष जापे अशी जखमींची नावे आहेत. याबाबतची माहिती वाई पोलिसांना व तालुका वैद्यकीय कक्षाला समजताच त्यांनी रुग्णवाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली.
वाई तालुक्यातील पांडवगडावर नृसिंहपूर इंदापूर तालुक्यातील सहा जण फिरण्यासाठी आले होते. यावेळी अचानक मधमाशा खवळल्या आणि हजारो मधमाशा पर्यटकांवर तुटून पडल्या. यात चार जण गंभीर जखमी झाले तर दोघे बेशुध्दावस्थेत होते. त्यांना तातडीने वाईच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.
To Top