Baramati Breaking l एक लाख रुपयांची लाच घेताना बारामती नगरपरिषदेचा नगररचनाकार लाचलुचपतच्या जाळ्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार विकास किशोर ढेकळे यांना लाच मागणी प्रकरणात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 
       बुधवार दि. १९ रोजी रात्री आठच्या सुमारास शहरातील एका जिममधून ढेकळे यांना एसीबीने ताब्यात घेत अटक केली. जीममध्ये एसीबीने केलेल्या या कारवाईची मोठी चर्चा शहरात झाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 
To Top