Baramati Crime l तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणत टोळक्याकडून कोयत्याने वार : पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आंम्ही कोण आहे तुम्हाला माहीत आहे का... आंम्ही गुन्हेगार आहोत, तुम्ही कुणाच्या नादाला लागत आहात असे म्हणत सहा जणांच्या टोळक्याने एकावर कोयता, लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संकेत राजेंद्र शेवाळे वय २७ रा. साखरवाडी ता. फलटण जि. सातारा यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी  ऋतीक उर्फ काल्या रावळकर, प्रमोद जगताप, सोनु नवले, भावेश रावळकर, पंकज सुहास पाटील, रणजीत रावळकर सर्व रा. वाघळवाडी कन्नडवस्ती ता. बारामती जि पुणे  यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
         याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ रोजी रात्री १० वाजता वाघळवाडी (कन्नडवस्ती) ता. बारामती जि. पुणे येथे संकेत शेवाळे व त्याचे मित्र हे सोमेश्वर करंजेपुल येथील जय भवानी हॉटेल या ठिकाणी जेवण करून त्यांचे घरी साखरवाडी येथे जात असताना आरोपी काल्या रावळकर, प्रमोद जगताप, सोनू नवले व भावेश रावळकर हे त्यांचेकडील मोटार सायकल वरून फिर्यादीचा पाठलाग करून कट मारुन कॅनल जवळ रोडवर थांबवुन व त्यांना गाडीवरून खाली उतरुन आरोपी  काल्या रावळकर हा शेवाळे यास म्हणाला की, "आंम्ही कोण आहे तुम्हाला माहीत आहे का" आंम्ही गुन्हेगार आहोत, तुम्ही कुणाच्या नादाला लागत आहात, असे म्हणुन, आरोपी काल्या रावळकर या याने कोणाला तरी फोन करूनं तुम्ही कोठे आहात, सर्वजण मटेरीअल घेऊन कॅनॉलचे पुलावर या असा फोन केला. 
          आरोपी काल्या रावळकर याने फिर्यादीचे कानावर दोन चापटी मारुन, त्याचे हातातील लोखंडी पाईप फिर्यादीचे मांडीवर मारला, तेवढ्यातच कन्नडवस्ती येथुन आरोपी प्रमोद जगताप हा कोयता घेवुन, आरोपी सोनू नवले व आरोपी पंकज पाटील हे हातामध्ये लोखंडी पाईप घेऊन तसेच आरोपी रणजित रावळकर दांडके घेवुन पळत त्या ठिकाणी आले त्यावेळी वरील सर्वांनी त्यांचे हातातील कोयता, लोखंडी पाईप, लाकडी दांडके हवेत नाचवुन त्या परीसरात दहशत निर्माण केली आहे. तसेच फिर्यादी व साक्षीदार यांना शिविगाळ करु लागले. त्यानंतर आरोपी प्रमोद जगताप याने फिर्यादीचे मित्र योगेश यास "तुला आता जिंवत ठेवत नाही, तु आता संपलाच असे म्हणुन योगेश यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने आरोपी प्रमोद जगताप याने त्यांचे हातातील कोयत्याच्या धारदार बाजूने योगेश याचे डोक्याचे दिशेने वार केला असता योगेश याने त्याचे डोके मागे घेतल्यामुळे त्याचे हुनवटीवर मार लागला असुन योगेश यास हुनवटीवर गंभीर दुखापत केली." व आरोपी रणजित रावळकर याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीचे मित्र शुभम यास पाठीवर मारले, व आरोपी भावेश रावळकर याने योगेश यास पाठीवर व मांडीवर त्याचे हातातील लोखंडी पाईपने मारले, त्याचवेळी आरोपी सोनू नवले याने त्याचे हातातील लोखंडी पाईपने शुभम यास मांडीवर, डावे हातावर मारल्याने डावा हाताचा अंगठा फॅक्चर झाला आहे. त्यावेळी आरोपी  
ऋतीक उर्फ काल्या रावळकर, प्रमोद जगताप, सोनु नवले, भावेश रावळकर, पंकज सुहास पाटील, रणजीत रावळकर यांनी शेवाळे व त्यांचे मित्र योगेश यास लाथाबुक्यांनी व हातातील लोखंडी पाईपने मारहाण केली आहे. पुढील तपास सपोउनि राहुल साबळे करत आहेत.
To Top