भोर l भोरचे सुपुत्र व मुंबईचे आमदार दिलीप मामा धावले भोर-वेल्हेकरांच्या मदतीला : दोन्ही तालुक्याचा विकासाचा मुद्दा अधिवेशनात मांडत आवाज उठवला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या गुंजन मावळ खोऱ्यातील तांभाड ता.भोर येथील सुपुत्र मात्र सध्याचे चांदीवली (मुंबई) विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात भोर,वेल्हा तालुक्याच्या विकासासंदर्भात नवनवीन मुद्दे मांडले. 
           पुणे - बेंगलोर हायवे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी पर्यंत ( राजगड किल्ला ) रस्त्याची झालेली दुरावस्था त्याची पाहणी करून तात्काळ नवीन रस्ता करावा, नसरापूर येथील बनेश्वर चा धोकादायक रस्ता तात्काळ मंजूर करून नवीन कामासाठी हाती घ्यावा तर दीडघर ते तांभाड रस्ता करून नदीवरील नवीन पूल बांधणे या विविध मागण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवला. मुंबईतील आमदारांनी भोर,वेल्ह्यातील विकास कामासाठी आवाज उठवल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून आमदार दिलीप लांडे यांचे अभिनंदन होत आहे.
Tags
To Top