सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सेवा सहयोग या फाउंडेशन मार्फत राईट टू सेफ्टी या प्रकल्पांतर्गत सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या ठिकाणी पालकांना व विद्यार्थ्यांना ७४ हेल्मेट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह तालुका कार्यवाहक सचिन घुले, विद्यालयाचे प्राचार्य पी. बी . जगताप, वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार रमेश नागटिळक, श्री देशमाने, संतोष शेंडकर, महेश जगताप, चेतनकुमार सकुंडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण भोसले सर्व लाभार्थी पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सेवा सहयोग फाउंडेशन गेली सोळा वर्षापासून पुणे शहरातील विविध भागांमध्ये तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ प्रकारचे विविध प्रकल्प राबवत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्कूल किट, महिला सबलीकरण, किशोरी विकास, युवा विकास, एज्युकेशन, इन्व्हरमेंट, एम्पॉवरमेंट, महाराष्ट्रातील जवळपास २६ जिल्ह्यांमध्ये एक लाखाहून अधिक स्कुल किट चे मोफत वाटप केले जाते. ज्यामध्ये आदिवासी डोंगराळ भागातील शाळांचा समावेश असतो. त्यामधीलच राईट टू सेफ्टी हा एक प्रकल्प आहे ज्या अंतर्गत गेली सहा वर्षापासून पुणे शहरातील विविध तालुक्यांमध्ये विविध शाळांमध्ये आजपर्यंत एक लाखाहून अधिक हेल्मेट पालकांना व त्यांच्या मुलांना मोफत वाटप करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये अपघातांची वाढती मालिका लक्षात घेऊन टू व्हीलर धारकांना हेल्मेट चे महत्व लक्षात यावे या अनुषंगाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला.