सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
दिवस असो किंवा रात्र विद्युत वाहक तारेशी मैत्री ज्यांची ते म्हणजे'लाईनमन 'आज राष्ट्रीय लाईनमन दिवस.
वास्तविक पाहता शहरे असो किंवा ग्रामीण भागात असो याठिकाणी वीज ही महत्त्वाची मानली जाते. घरगुती वापर किंवा शेतीसाठी वीज ही नित्याची बाब असते.. विज गेली की लोकांचा अर्थ ग्राहकांचा कालवा सुरू होते. अगदी महावितरणच्या उपकेंद्राला किंवा संबंधित लाईन म्हणला दूरध्वनीद्वारे वीज का गेली याची विचारणा होते. त्याचवेळी तात्काळ येतात ते म्हणजे "लाईनमन 'आल्यानंतर घटनास्थळाची किंवा वीज वाहक तारांची पाहणी करतात, कुठल्या विजवाहिनीमध्ये बिघाड आहे त्याची शहानिशा करून आपल्या कामास सुरुवात करतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे लाईनमन आपले कर्तव्य पार पाडतात. काही वेळेस तर जीव टांगणीला लावून ज्या ठिकाणी विद्युत वाहक तारांमध्ये बिघड झाला आहे त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतात. विशेषता पावसाळ्यामध्ये या लाईनमनची अधिक हाल होते. सोसाट्याचा वारा असो किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस यामुळे अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटतात, विजेचे खाम कोसळतात. त्यामुळे त्यांना यावेळेस कधी कधी बारा बारा तास काम करावे लागते. समाजामध्ये लाईनमन विषयी काही ठिकाणी नकारात्मक दृष्टिकोन असतो. तो काही फुकट पगार घेतो का, त्याचं ते कामच आहे असे मतप्रवाह सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होतात. परंतु लाईनमन हा सुद्धा माणूसच आहे. तो आपले कर्तव्य प्रामाणिक रित्या पार पाडतो. घरातील अंधार दूर करून घर प्रकाशमान करतो. हे मात्र तितकेच खरे आहे.