Baramati News l धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हाट्सअप स्टेटस : बारामती पोलिसांकडून एकाची १४ दिवसांसाठी येरवडा कारागृहात रवानगी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवणाऱ्या युवकावर अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी कडक कारवाई केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फत याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार एकाने आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर औरंगजेबाचा फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला होता.

या माहितीच्या अनुषंगाने लागलीच सदर इसमास पोलीस स्टाफच्या मार्फत ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यावर गोपनीय माहितीनुसार औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा फोटो व आक्षेपार्ह मजकूर मिळून आला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याकरिता पोलिसांनी त्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२७
प्रमाणे प्रस्ताव तयार केला. त्यानंतर यावर सुनावणी घेऊन सदर इसमाची कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर १४ दिवसांकरीता या तरुणाची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आली आहे.
To Top