सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : प्रतिनिधी
भिगवण पोलिसांनी दमदार कामगिरी करत उस वाहतूक करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याचा बारामती अग्रो कारखाना परिसरातून चोरी झालेला ट्रॅकटर हस्तगत करीत चोराच्याही मुसक्या आवळल्या.
१०० ठिकाणाचे सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय गोपनीय बातमीदाराच्या मदतीने केलेल्या कामगिरी मुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील चोरटा सोमनाथ भारत शिंदे वय .२३ रा.शिंदेवस्ती बावडा ता.इंदापूर याला अटक करण्यात आले आहे.याबाबत दिलेल्या माहितीनुसार शेतकरी उस वाहतूकदार अक्षय अनिल राउत रा.केतुर ता.करमाळा यांनी बारामती अग्रो कारखाना येथून आपला ट्रॅकटर नंबर एम.एच.४५ ए क्यू ३२०७ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली.उस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याची झालेली चोरी भिगवण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद महांगडे यांनी गांभीर्याने घेत सदर चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ,पोलीस अंमलदार महेश उगले ,संतोष मखरे ,सचिन पवार आणि प्रमोद गलांडे यांची टीम नियुक्त करून तपासकामी पाठविले. या टीम ने बारामती अग्रो कारखाना तसेच बावडा व इतर मार्गातील जवळपास १०० च्यावर सीसीटीव्ही चे आकलन करून तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार याच्या माध्यमातून बावडा येथील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या .मात्र या चोरट्याने ट्रॅकटर ला असणारी जी.पी.एस सेवा भवानीनगर परिसरात काढून टाकल्याचे लक्षात आले.त्यामुळे पोलीस पथकाने संशयित चोरट्याला बोलते करून त्याने नळदुर्ग ता.धाराशिव येथे लपविलेला मुद्देमाल ताब्यात घेत कारवाई पूर्ण केली.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे ,पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ,पोलीस अंमलदार महेश उगले,संतोष मखरे ,सचिन पवार ,प्रमोद गलांडे यांनी केली.