Baramati News l इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीचा फोटो टाकत अश्लिल मजकूर लिहला : २१ वर्षीय तरुणाच्या माळेगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्र अंतर्गत एका गावात वास्तव्यास असणाऱ्या इय्यता नववी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन शालेय मुलीच्या फोटो वापरुन त्या फोटोवर तीचे चारीत्र्या विषयी बदनामी होईल, असे जाणीवपुर्वक अश्लिल स्वरुपाचे मजकुर लिहुन त्याची इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर खाते (अकांऊंट) तयार करुन त्यावर स्टोरी ठेवलेचा प्रकार घडल्यानंतर माळेगाव पोलिसांनी शोध घेऊन
पवन राजेंद्र क्षिरसागर वय 21 वर्ष, रा. ढाकाळे ता. बारामती जि.पुणे याला अटक करण्यात आली आहे. 
         संबंधित शालेय विदयार्थिनीचे वडीलांना व कुटुंबियांना माहीती मिळाल्यानंतर पिडीत शालेय विदयार्थिनीचे वडीलांनी घडले प्रकाराबाबत माळेगाव पोलीस ठाणे येथे तकारी दाखल केली. सदर आदेशाचे अनुषंगाने सदर गुन्हयात वापरले इन्स्टाग्राम खाते (अकांऊंट) व त्याचा वापर करणारे अज्ञात आरोपीची माहीती शोधणेकरीता माळेगाव पोलीस ठाणे कडील स.पो.नि. सचिन लोखंडे यांचे सुचनेनुसार पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी इन्स्टाग्राम व फेसबुक या समाजमाध्यम चालविणाऱ्या मेटा प्लॅटफॉर्म या अमेरिकास्थित जागतिक कंपनीच्या कार्यालयाकडे संबंधित इन्स्टाग्राम खातेची माहीती मिळणेकरीता पत्रव्यवहार करुन त्यांचेकडुन माहीती प्राप्त करुन घेवुन त्या माहीतीचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा पवन राजेंद्र क्षिरसागर वय 21 वर्ष, रा. ढाकाळे ता. बारामती जि.पुणे यानेच केला असलेबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदर गुन्हयाचे चौकशीकामी पवन राजेंद्र क्षिरसागर यांस माळेगाव पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने वरील नमुद गुन्हा केलेची कबुली दिलेमुळे पवन राजेंद्र क्षिरसागर या युवकास सदर गुन्हयाचे कामी अटक करणेत आलेली आहे, 
      सदरची कामगिरी ही पंकज देशमुख (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, बारामती तालुका पोलीस ठाणे व तपास पथकातील माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक  तुषार भोर, पोलीस नाईक, ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग यांनी केलेली आहे.
To Top