सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दौंड : प्रतिनिधी
भावी नवरा पंसत नसल्याने नवरीनेच हत्येची सुपारी दिल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आहिल्यनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका तरुणाचे लग्न श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी दांगडे हिच्या जमले होते. पण मयुरीला तो तरुण पसंत नव्हता. तिला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. त्याला जिवे मारण्यासाठी मयुरी दांडगे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांची सुपारी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटानजीक यवत परिसरात काही जणांनी नवरदेवाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
भावी नवरदेव असणारा तरुण यवतजवळील खामगावमध्ये एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. त्यामध्ये, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांडगे रा. गुघलवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांसह हा खून केल्याची कबुली