सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन गहाळ अथवा चोरीला गेलेले सुमारे ३ लाख १५ हजार किमतीचे १७ विविध कंपनींचे मोबाईल फोन हस्तगत करुन सुपे पोलिस स्टेशनने दमदार कामगिरी केली आहे.
सुपे पोलीस स्टेशन हद्दीतील विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल गहाळ तसेच चोरल्याबाबतच्या तक्रारी येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या होत्या. त्यानुसार येथील प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांनी येथील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार किसन ताडगे आणि महादेव साळुंके यांना गहाळ मोबाईलचा शोध घेवुन हस्तगत करण्याचा आदेश दिला होता. त्यापैकी काही मोबाईल उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कोलकत्ता, गुजरात आणि कर्नाटक तर काही अहिल्यानगर तसेच मुंबई येथुन आले असल्याची माहिती पोलिस शिपाई किसन ताडगे यांनी दिली.
त्यानुसार गहाळ मोबाईलची तांत्रीक दृष्टया तपास करून त्याचे विश्लेषण करण्यात आले. यावेळी सुमारे ३ लाख १५ हजार किमतीचे एकुण १७ विविध कंपनीचे मोबाईल फोन विविध भागातुन तसेच परराज्यातुन हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्याचे सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे तसेच येथील गुन्हे शोधपथकाचे पोलिस हवालदार रूपेश साळुंके, विशाल गजरे, पो.शि. किसन ताडगे, महादेव साळुंके सुरज साळुंके, तुषार जैनक आदीच्या पथकाने ही कामगिरी केली.