Baramati News l जगातील शंभर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वपैकी सातव्या क्रमांकावर असलेल्या 'माहेर'च्या लुसी कुरियन सुप्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
माहेर संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा सिस्टर लुसी कुरियन यांनी केलेल्या प्रेरणादायी कार्याबद्दल सुपे येथील जीवन साधना फाउंडेशन संचालित प्राजक्ता मतिमंद निवासी शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती नीता बारवकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन सुप्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे होते. यावेळी राजमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली.
        जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या यादीत माहेर संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा सिस्टर लुसी कुरियन यांचे नाव सातव्या क्रमांकावर आहे. त्यांनी अत्याचारित, निराधार, अनाथ, अन्यायग्रस्त महिला व मुलांसाठी ही संस्था काम करते. देशातील सात राज्यांत संस्थेच्या शाखा आहेत. मनोरुग्ण, वयोवृद्धांना रस्त्यावरून उचलून माहेर संस्था त्यांना आधार देण्याचे कार्य करते.
         हा सन्मान माझ्या एकटीचा नसून संस्थेतील सर्व कर्मचारी व देणगीदारांचा आहे. तुम्ही सर्वांनी केलेला हा सन्मान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र आपण दिव्यांग (मतिमंद) मुलांचे निवासी पद्धतीने संगोपन करणे हे अवघड, खडतर काम आहे. अशा शब्दांत सिस्टर लुसी कुरियन यांनी प्राजक्ता शाळेच्या कामाचे कौतुक केले.
       यावेळी संस्थापक अध्यक्ष जयराम सुपेकर, मनोजकुमार नवसरे, बारामतीच्या आभाळमाया ग्रुपच्या अध्यक्षा अल्फा भंडारी, नीता बारवकर यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव डॉ. श्रीप्रसाद वाबळे, खजिनदार दत्तात्रेय दरेकर, संचालक अशोक बसाळे, मुख्याध्यापिका शुभांगी सुपेकर यांनी केले. याप्रसंगी परदेशी पाहुण्या आमिया, शिलानंद आंभोरे, रमेश चौधरी, सुप्याचे उपसरपंच शंकर शेंडगे, अश्विनी सकट, नयना जगताप आदी उपस्थित होते. व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले.
        .....................................
To Top