सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी चा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सध्या इव्हेंटमॅनेजर म्हणून स्वतःची फर्म चालवणाऱ्या श्रेया भोसले यांनी जे काम करण्यात आपल्याला मजा येते ओझं वाटत नाही आणि आयुष्यभर आनंद मिळवून देणार आहे असंच करिअर निवडा असा प्रेमाचा सल्ला दिला.
डॉक्टर प्राजक्ता भोसले यांनी संपूर्ण जीवनाच्या वाटचालीमध्ये शाळेची महत्त्व आणि शाळेत असताना झालेला सर्वांगीण विकास हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सुखदा जगताप यांनी विद्यार्थ्यांना महिला दिन हा फक्त एका दिवसापुरता न राहता वर्षातील 365 दिवस तुमच्या सहवासात येणाऱ्या सर्वच महिलांचा आदर करा. घरातील तसेच बाहेरील स्त्रियांना आदराची वागणूक आणि बरोबरीचे वागणूक देणे हाच खरा तीचा सन्मान आहे असे मत व्यक्त केले. व्हॉलीबॉल खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू अनुष्का बाविस्कर यांनी आयुष्यात खिलाडू वृत्ती येण्यासाठी हारजीत पचवण्यासाठी शालेय जीवनात खेळ हा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाने मैदानावर खेळले पाहिजे असा आग्रह धरला. वर्षभर अध्यापनाचे काम करणाऱ्या सर्व अध्यापिकांचा सन्मान विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य संजय कांबळे यांनी प्रास्ताविकातून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मीना वाबळे या होत्या, सूत्र संचालन प्राजक्ता यादव यांनी केले व सीमा पवार यांनी आभार व्यक्त केले