सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्व. संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी उद्या रविवार दि. ९ रोजी सोमेश्वरनगर व पंचक्रोशीतील गावांमधून मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामतीत रविवारी (दि. ९) रोजी मोर्चाचे आयोजन आले आहे. यावेळी मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. रविवारी सकाळी ९ वाजता मोर्चा सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. देशमुख यांच्या हत्येचे दुःख झालेले सर्व जाती-धर्माचे नागरिक मोर्चात सहभागी होतील.