Baramati News l बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा..! गडदरवाडीचा 'जयदीप' बनला वाशिम जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत अधिकारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे 
गडदरवाडी ता.बारामती येथील जयदीप मारुती गडदरे या युवकाची वाशिम जिल्हा परिषद या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झाली.   
          मेंढपाळाचे गाव, अल्पभूधारक शेतकऱ्याचे गाव अशी ओळख असलेल्या गडदरवाडीची नवी ओळख अधिकाऱ्यांचे गाव अशी झाली आहे.  काही महिन्यापूर्वी युवराज गरदडे या युवकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाला गवसणी घातली त्यानंतर रोहित येळे, सुधीर गलांडे, अमोल पिंगळे या युवकांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली. सोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक मारुती गडदरे यांच्या मुलाची वाशिम जिल्हा परिषद या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी निवड झाल्यामुळे महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन‌ उपाध्यक्ष निरा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्यामकाका काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
          जयदीप चे शिक्षण Msc Bed झाले असून प्राथमिक शिक्षण गडदरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत,Msc चे शिक्षण टी सी कॉलेज बारामती, तर Bed शिक्षण शास्त्र महाविद्यालय वाघळवाडी या ठिकाणी केले,  वडील सोमेश्वर अंजनगाव येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून तर बहिण पुणे महानगरपालिकेत शिक्षिका आहे. या विद्यार्थ्यांची यशाची शिखरे पाहून गडदरवाडी गावातील सुशिक्षित युवक स्पर्धा परीक्षा कडे वळला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.   
यावेळी गडदरवाडीचे उपसरपंच विशाल गलांडे, शिवाजी गडदरे, हनुमंत गडदरे, माऊली गलांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 
To Top