Bhor News l बंद घराचे कुलूप तोडत भोरेश्वर नगरमध्ये घरफोडी : ६८ हजारांचा ऐवज लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 भोर शहराशेजारील भोरेश्वर नगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या निलेश विलास कंक (रा.भोरेश्वर नगर ) ता.भोर यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून ऐवज लंपास केल्याची घटना रविवार दि .९ ते बुधवार दि.१२ च्या दरम्यान पहाटेच्यावेळी घडली.याची फिर्याद निलेश कंक भोरेश्वर नगर यांनी भोर पोलिसात दिली.
         पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार निलेश कंक आपल्या कुटुंबासमवेत देव दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते.यामुळे त्यांचे बंद घर होते.घर बंद असल्याचा चोरट्यांनी फायदा घेत घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटे फोडून सोने-चांदच्या वस्तू चोरून नेल्या व फोडलेल्या कपाटांमधील वस्तू कपडा- लत्ता अस्ताव्यस्त फेकून दिला.चोरट्यांनी एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल मोरे तसेच सुशांत पिसाळ करीत आहे.

दोन महिन्यानंतर पुन्हा बंद कर फोडले 
 मागील दोन महिन्यांपूर्वी भोर शहरात एकाच रात्री चार ते पाच बंद घरे फोडली होती या घटनेत २० लाखांच्या आसपास ऐवज चोरीला गेला होता. त्यानंतर नागरिकांना चोरट्यांचा विसर पडताच पुन्हा एकदा भोररेश्वर नगर येथे बंद घर फोडून चोरट्यांनी ६७ हजारांचा ऐवज कंपास केल्याच्या घटना घडल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    
Tags
To Top