सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर नगरपालिका शाळेत उपशिक्षिका म्हणून काम करणाऱ्या एका शिक्षिकेने स्वतःच्या जागेवर खाजगी महिला शिकवण्यासाठी ठेवल्यामुळे शिक्षण विभागाने उपशिक्षिका भारती दीपक मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार महाराणा प्रताप नगरपरिषद शाळा नं.१ मधील उपशिक्षिका मोरे यांनी आपल्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खाजगी महिलेची नेमणूक केली होती. ती महिला वर्गात अध्यापन करत असल्याचे मुख्याधिकारी यांचे निदर्शनास आले.मुख्याधिकारी यांनी हजेरी रजिस्टर तपासले असता मोरे अनुपस्थितीत असताना उपस्थित असल्याचे स्वाक्षरी केल्याचे दिसून आले.तर ठराविक रक्कम घेऊन या वर्गाचे अध्यापन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे असे त्या महिलेने सांगितले.त्यामुळे गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी मोरे यांना निलंबित केले.