सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
यवत : प्रतिनिधी
पडवी (ता.दौंड) येथील विवाहितेने पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे.ही घटना १७ मार्च २०२५ रोजी घडली विषारी कीटकनाशक घेतल्यानंतर तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सारीका प्रशांत शितोळे (वय ३५) असे मयत विवाहितेचे नाव आहे.तिला एक लहान मुलगा देखील आहे. याबाबत मुलीचे वडील जयसिंग फक्कडराव पवार (वय ६६, रा केडगाव, ता.दौंड) यांनी यवत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती प्रशांत मानसिंग शितोळे व सासू सुनीता मानसिंग शितोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पती प्रशांत शितोळे याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पती आणि सासूने डिलीव्हरी साठी गेलेले २५ हजार रुपयांची वेळोवेळी मागणी करत होते. तसेच मयत सारीका हिचा मुलगा विहान याचे दुभंगलेले ओठ या कारणावरून सारीका हिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला होता तसेच नवरा प्रशांत याची बाहेर सुरू असलेले अनैतिक संबंध यातून मारहाण करून तिला त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केले होते.
उपचारादरम्यान सारीका हिचा मृत्यू झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात तिच्यावर पडवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान विवाहितेच्या नातेवाईकांनी याबाबत पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. विवाहिता नक्की स्वतः विषारी कीटकनाशक प्यायली की तिला बळजबरीने पाजले गेले? याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.