विकृतीचा कळस ! भाजपच्या मंत्र्याने महिलेला पाठवले स्वतःचे नागडे फोटो

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारने राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र, महायुती सरकारच्याच काळात राज्यातील लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवले. इतकंच नाही तर जयकुमार गोरे यांनी पीडित महिलेचा कसा छळ केला या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दैनिक 'सामना' आलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 'लाडके मंत्री' जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. धक्कादायक म्हणजे पीडित महिला हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे. त्या महिलेची बदनामी करून त्रास दिला जात आहे. या प्रकरणी पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात व्यथा मांडूनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही, असे महिलेने पत्रात नमूद केले आहे. काहीही दोष नसताना मला त्रास दिला जात आहे, असा आरोप पीडितेने केला आहे. आता विधान भवनासमोर 17 मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा
इशारा देखील पीडित महिलेने दिला आहे.

राज्यपालांना पाठविलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना पाठविली आहे. पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने आपली व्यथा मांडली आहे.
To Top