Bhor News l वेळेवर बस न सोडणे..नादुरुस्त व खिळखिळ्या बस...विद्यार्थ्यांची हेळसांड...वाहकांची अरेरावी : भोर तालुक्यातील प्रवाशांचे खा. सुळेंपुढे गाऱ्हाणे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा भोर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कामासंदर्भात नागरिकांच्या समस्या व निवारण तसेच प्रांताधिकारी यांच्या समवेत बैठक मंगळवार दि .४ आयोजित करण्यात आली होती.दौऱ्यादरम्यान खासदार सुळे यांनी भोर बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी प्रवाशांनी एसटीमुळे नागरिकांचे होणाऱ्या गैरसोयीचे सुळेंसमोर घाराणे गायले.
           भोर एसटी आगाराकडून ग्रामीण भागात वेळेवर बसेस सोडल्या जात नाहीत,नादुरुस्त तसेच खिळखिळ्या झालेल्या एसटी बसेस ग्रामीण भागात चालवल्या जातात,शालेय विद्यार्थ्यांना तासंतास गावोगावच्या बस स्थानकासमोर एसटीसाठी वाट पाहावी लागते,अनेक एसटी बसेस मधील वाहक प्रवाशांना उद्धटपणे बोलतात या आणि अनेक समस्या खासदार सुळींच्या समोर प्रवाशांनी मांडल्या.खासदार सुळे यांनी प्रवाशांच्या समस्या समजावून घेत आगार व्यवस्थापकांना यापुढे प्रवाशांना एसटी बसेसची सेवा उत्कृष्ट मिळावी,एसटी बसेसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागू नये त्यासाठी खबरदारीचे उपाय करावेत अशा सूचना केल्या.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल,जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे,कार्याध्यक्ष संदीप नांगरे, समन्वयक मानसिंग धुमाळ,शहराध्यक्ष विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष किसन चोरगे, युवकाध्यक्ष गणेश खुटवड,शिवसेना तालुकाध्यक्ष हनुमंत कंक, प्रशांत जाधव,सारंग शेटे,आदित्य बोरगे,एसटी अधिकारी प्रदीप इंगवले व कर्मचारी उपस्थित होते.
Tags
To Top