सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात उसाचा ट्रक अंगावर पलटल्याने उसाखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला. तर तर ११ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
कन्नड-पिशोर रोडवरील कोळसवाडी खांडीत ट्रक (जीजे १० टीव्ही ८३८६) हा कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून रसवंतीसाठी लागणारा ऊस घेऊन जात असताना हा अपघात झाला. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. उसाने भरलेल्या या ट्रकमधून एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते. पण घाटात ट्रक येताच अचानक पलटी झाला. त्यामुळे अख्खा उसाचा बोजा कामगारांच्या अंगावर आला. त्यामुळे ६ कामगार जागीच ठार झाले. तर ११ जण जखमी झाले.