Indapur News l संतोष माने l भिगवण बसस्थानकाच्या समस्या कधी सुटणार ? बसस्थानकातील अपुऱ्या जागेमुळे रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात बसेस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : संतोष माने
इंदापूर चार तालुक्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या भिगवण येथील बस स्थानकाचे विस्तारीकरण अथवा काम कधी सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

वास्तविक पाहता भिगवण येथील बस स्थानकाला अपुरी जागा आहे. त्या ठिकाणी एकदम आठ ते दहा बस थांबल्यास उर्वरित बस सेवा रस्त्यावरती थांबण्याची वेळ संबंधित एसटी बसच्या चालकां वरती येते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिगवन येथील बस स्थानकाचा कायापालट होऊन नवीन असे सुसज्ज बस स्थानक उभारले जाईल अशी घोषणा केली होती. परंतु काही महिने उलटले तरी या  घोषणेबाबत काहीच दिसून आले नाही. आम्ही जेव्हा भिगवन बस स्थानकाची पाहणी केली असता, त्या ठिकाणी सोलापूर बाजू कडून किंवा पुणे बाजू कडून येणाऱ्या बस थांबण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे दिसते. काही बस सर्विस रस्त्याच्या अर्ध्या मध्ये लागल्याची दिसून आले. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्द पाळून भिगवन बस स्थानकाची नवीन निर्मिती करून प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी अनेक प्रवाशांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. परंतु बसची संख्या पाहता या ठिकाणी गर्दी होत असल्याने बस थांबवण्यात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे भिगवणकरांची एकच अपेक्षा आहे. भिगवण बस स्थानकाचे नूतनीकरण कधी होणार याबाबत विविध चर्चा रंगत आहेत. चार तालुक्याची बाजारपेठ असलेले भिगवन या ठिकाणी सुसज्ज अशा बस स्थानकाची गरज आहे. मात्र अपुरी जागा व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष यामुळेच हे विस्तारीकरण थांबल्याचे दिसते. काहीही असो लवकरच भिगवण बस स्थानकाची विस्तारीकरण क्षमता व अपुरी पडणारी जागा याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. असे मतप्रवाह अनेकांनी व्यक्त केले .
To Top