Indapur Breaking l संतोष माने l पुणे-सोलापूर महामार्गावर मदनवाडी ब्रिजवरून कंटेनर कोसळला : चालकाचा मृत्यु

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : संतोष माने
पुणे सोलापूर महामार्गांवर मदनवाडी ब्रिज वरून सर्व्हिस रोड वर कंटेनर कोसळल्याने झालेल्या भीतीदायक अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.       
           सुदैवाने या कंटेनर खाली इतर वाहने आणि नागरिक न आल्याने मोठी जीवितहानी टळली. या भयानक अपघाताने तरी भिगवण कर नागरिक जे महामार्गांवर अतिक्रमण करून व्यवसाय करतात आणि अनधिकृत पणे पार्किंग करतात त्यांचे डोळे उघडतील अशी आशा व्यक्त होत आहे.
           याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे सोलापूर महामार्गांवरील पुणे बाजूकडे जाणाऱ्या कंटेनर एमएच ४३ सीके ६५११ हा मदनवाडी गावच्या हद्दीत अशोका हॉटेल समोर मुख्य रस्त्यावरील ब्रिज वरून खाली कोसळला. या अपघातात चालक श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव वय ३७ वर्षे, रा. मुंबई मूळ रा उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात 6 वाजण्याच्या सुमारास घडला असून झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे 40 ते 50 फूट खाली असणाऱ्या सर्व्हिस रोडवर कंटेनर आदळला. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन अथवा प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तसेच महामार्ग पोलिसांनी घटना स्थळी भेट घेत अपघात ग्रस्त वाहन काढण्याचे कार्य सुरु केले. कंटेनर समोरील वाहन तातडीने काढून कंटेनर काढण्यासाठी काम सुरु केले.कंटेनर बाजूला केल्यावर या खाली कोण दबले आहे काय याचा शोध लागेल. मात्र हा अजस्त्र कंटेनर उचलण्यासाठी लागणारी सामग्री जमविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
मात्र या अपघाताने तरी भिगवण कर नागरिकांना जाग यावी ही अपेक्षा कारण महामार्गवर अशा प्रकारे अनेक अपघात घडले असून यातून काही बोध भिगवण करानी घेतला असल्याचे आतापर्यंत तरी दिसून आले नाही. भिगवण बस स्थानकासमोर असाच एक अपघात घडला होता. तर एका माथेफिरूने बस पळवून केलेला अपघात तसेच पुणे बाजूला जाणाऱ्या इंडिका गाडीने अनेक गाड्यांचे केलेले नुकसानाचा अपघात, गेल्या 15 दिवसापूर्वी आजचा अपघात घडला त्याच समोर घडलेला अपघात अशी अपघातांची मालिका रोज घडत असूनही अजूनही रोड वर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. तर महामार्ग पोलीस आणि हायवे प्रशासन अपघात झाल्यावर पंचनामा शिवाय अनधिकृत पार्किंग आणि व्यवसाय हटविताना दिसून येत नाही. या अपघाताने तरी सर्वांचे डोळे उघडून जिवा पेक्षा व्यवसाय मोठे नाहीत याची जाणीव व्हावी ही तमाम नागरिकांची मागणी आहे. 
To Top