पुरंदर l सासवड येथे उद्या शासकीय योजनांचा व सेवांचा महामेळावा : नागरिकांनी फायदा घ्यावा... न्या.व्ही.सी बर्डे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व तालुका विधी सेवा समिती सासवड यांचे संयुक्त विद्यमाने उद्या रविवार ता.१६ मार्च २०२५  रोजी वाघीरे महाविद्यालय,सासवड येथे शासकीय योजनांचा व सेवांचा महामेळावा आयोजित करणेत आला आहे.
    जिल्ह्यातील बारामती,इंदापूर,दौंड,पुरंदर व भोर इत्यादी तालुक्यातील लाभार्थ्याकरिता हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभय श्रीनिवास ओक यांचे हस्ते या महामेळाव्याचे उद्घाटन होणार असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे,न्यायमूर्ती श्री संदीप वि मारणे,न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर इत्यादी मान्यवर या महामेळाव्यात मार्गदर्शन करणार असून पुणे जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांचे अध्यक्षतेखाली हा महामेळावा पार पडणार आहे.या मेळाव्याला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ,मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील इत्यादी मान्यवर हजर राहणार असून सकाळी साडेदहा वाजता हा महामेळावा सुरू होणार असून बारामती,दौंड,इंदापूर,पुरंदर व भोर तालुक्यातील नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन बारामती जिल्हा न्यायालयाचे चे मुख्य न्यायाधीश तथा विधी सेवा समिती अध्यक्ष  व्ही.सी.बर्डे व बारामती वकील संघटना अध्यक्ष प्रभाकर बर्डे यांनी केले आहे .
To Top