सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
महाड : संतोष म्हस्के
महाड -पुणे महामार्गावर वरंधा घाटात रामदास पठारावरून महाड बाजूकडे जाताना एसटी बस ५० फूट कोसळून अपघात झाल्याची घटना घडली.
अपघातामध्ये बसमधील सुमारे १५ ते १६ प्रवासी जखमी झाले असून अपघात शनिवार दि.१५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रामदासपठार ते महाड एसटी बस महाड बाजूकडे येत असताना वरंध घाटामधील एका अवघड वळणावर बस रस्त्याच्या खाली सुमारे ५० फूट खोल कोसळली. बसमध्ये अडकलेले तसेच जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढून बिरवाडी आणि महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे.