सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मेढा येथे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान लग्नाच्या निमित्ताने आलेल्या सुरज चव्हाण याने फळे खरेदी केली. त्या दरम्यान फळे विक्रीता व सुरज साळुंखे यांच्यात झालेल्या वादातून बाचाबाचीस सुरुवात झाली. यावेळी झालेल्या वादावादीत सुरज चव्हाण व सुरेश साळुंखे यांच्यावर गजाने व हातोडयाने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उचचार सुरू आहेत.
आज (दि. १५ ) रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान मेढा येथे छ.शिवाजी महाराज चौकामध्ये एक विवाहानिमित्ताने मिरवणूक शांततेत सुरू होती. यावेळी या विवाहासाठी आलेले सुरज मच्छींद्र चव्हाण वय ४२ रा. सातारा व सुरेश महादू साळुंखे वय ६९ रा. महाबळेश्वर हे फळे खरेदी करण्यासाठी एका हात गाड्यावर गेले होते. त्याठिकाणी खरेदी बिलामध्ये २० रु. कमी करण्याची मागणी सुरज चव्हाण याने केली असता त्यावरून वादास सुरुवात झाली.
यावेळी फळ विक्रेता व खरेदीदार यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीवर उतरले याच वेळी काही तरुण मुलांनी माझ्या डोक्यात पाठीमागुन गजाने व हातोड्याने वार केल्याचे सुरज चव्हाण याने विचारले असता सांगीतले. तसेच दागिने व काही रोख रक्कम सुद्धा गेल्याचे सांगितले.
तसेच सुरज चव्हाण बरोबर असलेले सुरेश साळुंखे यांच्याही डोक्यामध्ये पाठीमागे एक व समोरील बाजूस एक असे वार करण्यात आले. दोघांच्याही डोक्याला गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनास्थळी सपोनि सुधीर पाटील यांनी भेट देऊन पाहणी करीत जखमींची विचारपुस केली. तसेच संशियतांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. रात्री उशीराने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
मेढा शहरात दिवसेंदिवस सुरु असलेल्या घटणांमुळे जनसामान्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. पोलीसांनी याकडे लक्ष देणे गरजचे असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मेढ्यामध्ये नक्की पोलीसांची कि गुंडागिरी करणारांची दहशत आहे असा प्रश्न विचारला जात आहे.